फलटण चौफेर दि १७ मे २०२५
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यात १७ मे २०२५ पासून ड्रोनसह इतर मानवरहित हवाई यंत्र (Unmanned Aerial Vehicles - UAV) वापरण्यावर बंदी घातली आहे.
या आदेशानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा अन्य UAV उडविणे, वापरणे किंवा त्यांचा उपयोग करणे यावर ३ जून २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई संभाव्य सुरक्षा धोके लक्षात घेऊन करण्यात आली असून, UAV चा वापर करून अनुचित किंवा बेकायदेशीर कृत्ये होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २३३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर आदेश तातडीच्या परिस्थितीत एकतर्फी (ex parte) लागू करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात १७ मेपासून ड्रोन वापरावर बंदी
May 16, 2025
0