Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

१८ वर्षांनंतर मित्रांचा गेट टुगेदर; जुन्या आठवणींना उजाळा

 


    


तरडगाव(नवनाथ गोवेकर)

१८ वर्षांनंतर एकमेकांपासून दूर गेलेल्या जुने मित्र एकत्र आले आणि आनंदाचा क्षण साजरा केला. शाळा संपल्यानंतर सर्वजण वेगवेगळ्या वाटांनी गेले होते. पण सोशल मीडियाच्या मदतीने सर्वांनी पुन्हा संपर्क साधला आणि एक विशेष गेट टुगेदर आयोजित केला. या भेटीत बालपणाच्या गमती-जमती, शाळेचे दिवस आणि आठवणींना उजाळा देण्यात आला. काहींनी आपले यशाचे प्रवास सांगितले तर काहींनी जुन्या आठवणींवर हसून वेळ घालवला. तरडगाव तालुका फलटण येथील सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल मधील सन २००६-०७ या १० वी च्या वर्गाचे रविवारी २७ एप्रिल रोजी स्नेहसंमेलन उत्सवात पार पडले. शालेय जीवनातील स्नेह जपणारे मित्र तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. सकाळी शाळेला भेट व नंतर अंजली कृषी पर्यटन येथे गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. 


विविध शहरांमध्ये, तसेच परदेशात स्थायिक झालेल्या या मित्रांनी एकत्र येऊन बालपणाच्या गोड आठवणींना उजाळा दिला. या विशेष प्रसंगी सर्वांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाबद्दल अनुभव कथन केले. काहींनी शाळेतील किस्से सांगून हास्याची कारंजी उडवली, तर काहींनी जुन्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला. दीर्घकाळानंतर प्रत्यक्ष भेट होत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी प्रशालेचा प्राचार्या संगीता काकडे, निवृत्त शिक्षक रवींद्र भोसले, सुनील क्षीरसागर, शहाजी गायकवाड हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, मित्रांनी दरवर्षी एक गेट टुगेदर आयोजित करण्याचा संकल्प केला आणि या मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.