तरडगाव नवनाथ गोवेकर
तरडगाव ता. फलटण येथे दर सोमवारी आठवडे बाजार मोठ्या प्रमाणत भरत असतो. मात्र सोमवार दि. ७ एप्रिल रोजी आठवडे बाजारादिवसी विज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला आणि पुन्हा एकदा महावितरणच्या कारभारामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगलीच तारांबळ झाली.तरडगाव येथे सोमवारी आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. सदर बाजार हा गावातील ग्रामपंचायत चावडी येथे भरवला जातो मात्र पारायण सप्ताह चालू असल्यामुळे आठवडे बाजार हा पालखी तळावर भरविण्यात आला होता. गावासह शेजारील वाडी वस्तीवरील शेतकरी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतो. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक बाजारासाठी येत असतात. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने नागरिक बाजारासाठी उशिरा जाणे पसंत करत आहेत त्यामुळे बाजार साधारपणे ६ वाजल्यापासून सुरू होतो. ग्रामपंचायतीने पालखी तळावर बसवलेलं विजेचे दिव्याच्या प्रकाशामध्ये बाजार होत असतो. मात्र सोमवार दि. ७ एप्रिल रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने विजय गायब झाली आणि बाजार करताना शेतकरी व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली.काही शेतकऱ्यांनी सोबत आणलेले टॉर्च डोक्याला बांधून आपला भाजीपाला विक्री सुरू ठेवली तर काहींनी मोबाईल टॉर्च आधार घेतला. भाजीपाला निवडताना नागरिकांनाही चांगलीच कसरत करावी लागली. संध्याकाळी उशिरापर्यंत विज आलीच नाही.महावितरणच्या विजेच्या नियोजनावर नागरिकांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.