फलटण चौफेर दि १४ एप्रिल २०२५
भिलकटी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रध्देने साजरी करण्यात येत आहे. सकाळपासूनच संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण असून, नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
सकाळी जयंती महोत्सवाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रामचंद्र घोडके, शशीकांत डिसले, शांताराम काळेल पाटील, नितीन कांबळे, निलेश गोरे, नंदकुमार कोलवडकर, दिपाली कांबळे, तृप्ती कांबळे, स्वप्निल कांबळे, भारत कांबळे, दादासो मोहिते, तुकाराम कांबळे, रोहित कांबळे, ऋतिक कांबळे, प्रशांत जगताप, मंगेश कांबळे, प्रितम नाळे, गजानन ननावरे, श्रीकांत डिसले, आत्माराम काळुखे,नागेश भंडलकर, राजकुमार कांबळे, विकास कांबळे, मिलन कांबळे, प्रतिक कांबळे, तेजस कांबळे, कुणाल कांबळे, अमोल कांबळे, अनिल बनसोडे, देवानंद कांबळे, बापुराव कांबळे, प्रदीप कांबळे, पुराणिक कांबळे, अर्जुन खरात, आनंद मोरे, सुनिल ननावरे, गणेश ताकवले, राजेंद्र चोरमले, निखिल शिंदे, सुरज शेळके, शांताराम पोटे, नवनाथ कदम, मल्हारी भंडलकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी गावातील सर्व नागरिकांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
या महोत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे, दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता निघणारी भव्य संवाद्य मिरवणूक. या मिरवणुकीसाठी गावातील तरुण वर्ग, महिला मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उत्साहाने तयारी करत आहेत. डीजे, पारंपरिक वेशभूषा आणि सामाजिक संदेश घेणारे फलक यांचा सहभाग असलेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.या महोत्सवाचे आयोजन केवळ औपचारिकतेपुरते न ठेवता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकजूट आणि बंधुभाव यांना चालना देण्याच्या हेतूने करण्यात आले आहे. गावातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.