Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुधोजी हायस्कूलच्या १९७५ सालच्या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न

 



फलटण चौफेर २९ एप्रिल २०२५

 मुधोजी हायस्कूल फलटण मधील शालांत परीक्षा १९७५ च्या बॅचचा स्नेह मेळावा नुकताच सेलिब्रेशन हॉटेल रिंग रोड फलटण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी या मेळाव्याचे समन्वयक नंदकुमार केसकर यांनी प्रथम सर्वांचे स्वागत करून आपण १९७५ पासून शाळेतून बाहेर पडल्यावर कोण कुठे नोकरी व्यवसाय यामध्ये रममाण झालो. परंतु या मेळाव्याच्या उद्देशाने सर्वांची परत भेट व्हावी व आनंद लुटावा या उद्देशाने हा समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी बोलताना व्ही.वाय. माने सर यांनी सांगितले की आपली पिढी जुनी आहे, आपणावर त्यावेळी जे संस्कार झाले त्यातूनच आपण उत्तम नागरिक घडलो आता परिस्थिती बदलली आहे. तरीही आपण नवी व जुनी पिढी यामध्ये समन्वय साधावा. नवीन पिढीला समजावून घ्यावे, आपला छंद जपावा जोपासावा, आपली तब्येत उत्तम ठेवावी व कौटुंबिक स्वास्थ्य राखावे असे सांगितले. यावेळी विजय ताथवडकर यांनी प्रमुख मान्यवरांचे गौरव करून हा मेळावा म्हणजे आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे असे सांगितले. यावेळी प्रथम सौ. मीना सहस्त्रबुद्धे यांनी गणेश स्तवन सादर केले. आशा वेलणकर- प्रभुणे यांनी पाहुनी रघुनंदन सावळा,  तोच चंद्रमा नभात ही गीते सादर केली. यावेळी मोहन मोरे व अजित देशमाने यांनी शाळेतील जुन्या आठवणी व शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या. तसेच दिलीप कुलकर्णी यांनी जुन्या व नव्या नाण्यांचा संग्रह कल्पक मांडणी करून साजरा केला. या कार्यक्रमास तीस सदस्य हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय ताथवडकर यांनी केले. तर आभार चंद्रशेखर हेंद्रे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.