फलटण चौफेर दि ३ एप्रिल २०२५
फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द, गावच्या हद्दीत दि १२ मार्च रोजी रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा कोयत्याने वार करून खून झाला होता. याप्रकरणी मुख्य सूत्रधार दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर हा पसार आहे. त्यामुळे दत्तात्रेय याची माहिती देणाऱ्यास लोणंद पोलिसांनी १ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी दत्तात्रेय निंबाळकर याचा साथीदार विनोद महादेव राक्षे याला अटक केली आहे. मात्र, गेल्या १८ ते २० दिवसांपासून दत्तात्रेय पोलिसांना सापडलेला नाही. त्याची कोणाला माहिती मिळाल्यास लोणंद पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.