Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चालकाचा डंपर घेऊन पोबारा!

 


फलटण चौफेर दि १६ एप्रिल २०२५

तरडगाव ता फलटण गावाच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावरून चालकाने मालकाच्या सहमतीशिवाय डंपर घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे  याबाबत डंपर मालक भानुदास महिपती डोंबाळे रा डोंबाळवाडी ता फलटण यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास त्यांचा ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा डंपर क्रमांक (एम एच ४६ ए आर ८३१६) हा  चालक आबा बाबा पवार रा पवारवाडी मार्डी तालुका माण जिल्हा सातारा याने त्यांच्या सहमंतीशिवाय लबाडीने लंपास केला आहे याबाबतचा पुढील तपास लोणंद पोलीस स्थानकातील हेड कॉन्स्टेबल बापूराव मदने करीत आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.