सातारा दि ०८ फेब्रुवारी २०२५ (जी मा का)सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे, मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा महोत्सव सातारा येथील श्री शाहू कलामंदिर येथे दिनांक ७ ते ११फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. तमाशा ही महाराष्ट्रातील एक पारंपारिक कला असुन या कलेतून वगनाटयाद्वारे संगीतमय सादरीकरण होत असते. तमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे. या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं, बारामती यांचे सादरीकरण होईल. तर दिनांक ८ फेब्रुवारी २०२५
मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळं करवडी, सातारा या तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल.तर दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ शालिग्राम व शांताराम रोहिणीकर तमाशा मंडळ ता. शिरपूर जिल्हा धुळेया खांदेशातील तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल.दिनांक १० फेब्रुवारी २०२५
रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळं, संगमनेर या मंडळाचे सादरीकरण होईल. दिनांक ११फेब्रुवारी २०२५ रोजी वसंतराव वाडेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कराड यांच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समरोप होईल. हा महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य असून सातारा येथे होऊ घातलेल्या या लोकनाट्य तमाशा महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा, वग नाट्य, नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री. विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.