Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीत 'रोटरी चषक' क्रिकेट सामन्यांचे आयोजन

 


फलटण चौफेर दि १५ फेब्रुवारी २०२५

साखरवाडी ता फलटण येथे ग.वि. भोसले सर प्रतिष्ठान आयोजित रोटरी चषक (साखरवाडी प्रीमियर लीग) या फुल स्पीच टेनिस क्रिकेट सामन्यांचे आज दि १५  व १६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे या  सामन्यांचा  शुभारंभ श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते व साखरवाडीच्या सरपंच सौ अपर्णा बोडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन डी के पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड, दत्तात्रय वाघ, दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्याचे खो-खोचे माजी प्रशिक्षक संजय बोडरे सर श्री दत्त श्रीदत्त इंडियाचे टेक्निकल युनिट हेड आमोद पाल, चीप इंजिनिअर अजित कदम,  ज्ञानदेव भोसले, ग वि भोसले प्रतिष्ठानचे सचिन भोसले, संजय भोसले, गणेश गायकवाड, मनोज भोसले, संपत पवार, विलास भगत, के के भोसले, माऊली गायकवाड ,ओंकार भोसले प्रसिद्ध समालोचक शिवव्याख्याते अमोल खेसे यांची प्रमुख उपस्थिती होती


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.