फलटण चौफेर दि १७ फेब्रुवारी २०२५ फलटण तालुक्याचे पूर्व भागातील पंचबिघा(गोखळी) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिरामध्ये श्री . हनुमान मुर्ती प्रतिष्ठाना कलशारोहन सोहळा पंचबिघा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने अभिषेक होम हवन मंत्रोच्चार करून धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. गोखळी येथील मठाचे मठाधिपती ओंकारगिरी इच्छागिरी नागेमहाराज यांच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले.प्रारभी कलसपूजन करुन टाळ मृदंग वीणा साथीने हरीनामाच्या गजरात मंदिर परीसरात मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी ह.भ.प.अनिल महाराज पोरे भरणेवाडी (ता. इंदापूर. ) महाराज यांचे हरी किर्तन झाले. भाविक भक्तांसाठी .महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कलशारोहण समांभ यशस्वी करण्यासाठी विठ्ठल - रुक्मिणी तरुण मंडळ आणि ग्रामस्थानी परीश्रम घेतले. यावेळी गोखळी, पंचबिघा, शांतीदासनगर व परीसरातील भाविक भक्त, महिला भाविकांची उपस्थिती होती.