फलटण चौफेर दि ५ फेब्रुवारी स्वयंभू दत्त मंदिर (खामगाव ) ता फलटण मठाधीपती महंत उमेशानंद महाराज यांचेवर महाकुंभ प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभ मेळ्यामध्ये श्री पंचदाशनाम जुना आखाडा १६ मढी केशवपुरी मुलतानी मढी प्रयागराज येथे श्री श्रीमहंत सेक्रेटरी दयानंद पुरीजी ह्रिषीकेश सेक्रेटरी गिरणार यांचेकडून नागा दिगंबर साधू बिजहवन संस्कार होऊन उमेशनंद महाराज हे दिगंबर नागा साधू झाले व महाराष्ट्र राज्य मंडल व त्रंबकेश्वर जुना आखाडा चे श्री श्रीमहंत उमेशानंद पुरीजी महाराज म्हणून नामकरण होऊन स्थानपन्न झाले आहेत.तसेच उमेशानंद महाराजांना महाराष्ट्र राज्य मंडळाचे व त्रंबकेश्वर जुना आखाडा चे श्रीमहंत हे पद देऊन श्री श्रीमहंत उमेशानंद पुरीजी महाराज या नावाने पुकार करण्यात आला आहे साखरवाडी येथे महाराजांच्या आगमनाच्या वेळी शिष्यगण परिवार व ग्रामस्थांनी उपस्थितीत महाराजांची रथामध्ये सहवाद्य मिरवणूक काढुन दर्शन सोहळा संपन्न झाला