फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी २०२५
१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती फलटण येथील पुनर्वसन गोळेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नलवडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, धापते साहेब, यादव साहेब, क्षीरसागर साहेब यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी गोळेगाव मधील सर्व शिवप्रेमी, गावातील सर्व ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. पद्मावती नवतरूण क्रिडा मंडळातील मुलांनी किल्ले रायरेश्वर येथून शिवज्योत घेऊन गोळेगाव पर्यंतचा प्रवास केला, यावेळी गोळेगाव मधील सर्व शिवप्रेमींचे मा.पोलीस अधिकारी साहेब यांनी कौतुक केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवरायांच्या संपूर्ण चारित्र्यावर भाष्य केले व जयंतीच्या निमित्ताने मुलांवर चांगले संस्कार करावेत असे सांगितले उपस्थितांचे स्वागत आकाश गोळे यांनी केले तर आभार सचिन शेगर सर यांनी मांडले .यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच तरुण वर्ग यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.