Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील दोन टोळयांमधील १३ जण दोन वर्षाकरीता तडीपार

  


फलटण चौफेर दि १८ फेब्रुवारी २०२५

 फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये  पोलीस कारवाई करून सुद्धा सातत्याने खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन  मारामारी करणे, दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील १३ जणांना दोन वर्षाकरिता सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे तडीपार केलेल्यांमध्ये  रोहीत भिमराव जाधव, राहुल भिमराव जाधव, गौरव बाळासो भंडलकर, ऋऋतिक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो भंडलकर सर्व रा. सरडे ता फलटण  व  छगन मोहन मदने, चेतन शंकर लांडगे, साजन नानासो चव्हाण तिघेही रा सोनगांव बंगला ता फलटण, दिपक दत्तात्रय धायगुडे, आदेश सुखदेव जाधव, सुरज शिवाजी बोडरे, निलेश सुनिल जाधव,विक्रम ऊर्फ आप्पा लालासो जाधव रा. सरडे यांचा समावेश आहे यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत  फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक  सुनिल महाडीक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा च पुणे जिल्हयातुन दोन वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावांची चौकशी  राहुल यस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.सदर परस्पर विरोधी टोळयांतील हद्दपार इसम हे टोळीने फलटण तालुका परिसरामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया चालु ठेवत असल्याने त्यांचेवर वेळोवेळी फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत.  त्यांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळयांचा उपद्रव होत होता आशा टोळयांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोड़वा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कों केतन शिंदे, मपोकों अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोउनि श्री गोपाल बदने, पोहवा वैभव सुर्यवंशी यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.