Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

.... तर मग रामराजे तुमच्या स्टेजवर का न्हवते ? : ना. अजित पवार



फलटण चौफेर दि १९ नोव्हेंबर २०२४

पवार साहेब सुरुवातीला आमदार झाले त्यावेळी मी तिसरीत होतो मी त्यांना आमदार केल असं मी कसं म्हणेन?जर साहेबांनी रामराजेंना आमदार केलं तर मग साहेबांच्या सभेत स्टेजवर खुर्चीवर बसलेले का दिसले नाहीत? साधं सोपं सरळ गणित आहे. जर मी कुणाला पदाधिकारी केलं तर मी आल्यावर तुम्ही मला मान देणार ना, तुम्ही माझ्यासोबत बसणार ना? अरे, मग साहेब आले तरी देखील तुम्ही स्टेजवर येत नाही. याच्यामागे काय भानगड आहे. याचे उत्तर श्रीमंतांना द्यावे लागेल. आता रयतेचं राज्य आहे. सगळ्यांना समान अधिकार आहे. आपण गादीला मान देतो. त्याबद्दल टीका टिप्पणी करण्याचे कारण नाही. पण हे जे काही चाललेलं आहे हे फलटणकरांना समजते. फलटणकर एवढे दूधखुळे नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.


फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, उमेदवारबसचिन पाटील, शिवरुपराजे खर्डेकर,जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, डी. के. पवार, जिजामाला ना. निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, विश्वास भोसले, प्रतिभा शिंदे उपस्थित होते.ना. अजित पवार म्हणाले,१९९५ पासून फलटण तालुक्याचे नेतृत्व रामराजेंकडे  आहे. तालुक्यातील सर्व संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली असताना फलटणचा विकास झाला नाही. बारामतीचा प्रचंड विकास झाला इथे विकास का झाला नाही? नेतृत्व कमी पडलं की, नेतृत्वात कर्तृत्व नव्हतं?याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही धडपड करत आहोत. इथले विद्यमान आमदार निष्क्रिय आहेत. तालुक्यात त्यांचा कोणाशी संपर्क नाही. फलटण शहराची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तालुक्यातील सर्व संस्थांची वाट लागली आहे. या डबघाईला आलेल्या सर्व संस्था उर्जितावस्थेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. श्रीमंतावर टीका करून आमची रेघ वाढत नाही. आम्हाला आमचे कर्तृत्व दाखवावे लागणार आहे. सचिन पाटील म्हणाले, मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना मला माहित आहेत. त्या दूर करण्यासाठी शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, तालुक्यातील जनतेला वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी फलटण शहरासह तालुक्याच्या चौफेर विकासासाठी मी उमेदवारी करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.