Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदूतांचे जावली येथे स्वागत.

 


फलटण चौफेर दि २९ नोव्हेंबर २०२४ जावली, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत.जावली येथील ग्रामपंचायत कार्यालयाला उद्यानदूतांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बुदावले , उपसरपंच मोहन नाळे, कृषीसहाय्यक   सतीश इप्परकर , ग्रामसेवक विठ्ठल पवार व समस्त ग्रामस्त मंडळ  यांनी उद्यानदूतांचे स्वागत केले.उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पिक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध अँपद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत उद्यानदूत शिंदे ओंकार, सुमंत अथर्व, गोफणे विशाल, समिंदर साहिल, ढेकळे करण व इपार किरण हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात उद्यानदूत कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे.व्ही. लेंभे, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए.डी. पाटील यांचे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.