फलटण चौफेर दि २२ नोव्हेंबर २०२४
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी उद्या शासकीय गोदाम या ठिकाणी होणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे त्यानुसार गिरवी नाका ते धनगरवाडा कडे येणारी जाणारी वाहतुक धनगरवाडा ते कॉलेजरोड येथून रिंगरोडने धनगरवाडा बाजूकडे,धनगरवाडा ते गिरवी नाकाकडे येणारी- जाणारी वाहतुक धनगरवाडा ते कॉलेजरोड येथून रिंगरोडने गिरवी बाजूकडे, गिरवी नाका ते महात्मा फुले चौककडे जाणारी-येणारी वाहतुक लाकडी चौकातून डेक्कन बाजूकडे, महात्मा फुले चौक ते गिरवी नाकाकडे येणारी-जाणारी वाहतुक डेक्कन चौक ते लाकडी चौक ते रिंगरोड बाजूकडे व रेस्ट हाऊस कॉर्नर ते डेक्कन चौक व मालोजीराजे पुतळा ते महात्मा फुले चौक मार्ग पुर्णपणे वाहतुकीस बंद (शासकीय वाहने वगळून) करण्यात आली आहे