फलटण चौफेर दि २७ नोव्हेंबर २०२४ फलटण शहरामधील गजानन चौक येथील न्यू गजराज किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम,तेलाचा डबा व बॅटरी असा ८हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकात सौरभ तेली यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास म पो हवा राणी फाळके करीत आहेत