साखरवाडी (दादा जाधव)
साखरवाडी ता.फलटण येथे गणपती मंडपात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय पोषण सोहळा अंगणवाडी बीट -साखरवाडी व निंभोरे यांच्या वतीने राबविण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन श्री दत्त इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर अजितराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती शंकरराव माडकर,सामाजिक कार्यकर्ते दिलीप(बाबा) पवार,पर्यवेक्षिका जावळेकर मॅडम उपस्थित होते तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ, पौष्टिक आहार,अंगणवाडी कडून राबविण्यात येणारे कार्यक्रम यांचे प्रात्यक्षिक मांडणी केली होती एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आला हिरकणी कक्ष,आकार अंकुर, आरंभ या उपक्रमांची माहिती देण्यात आले गरोदर मातेचे सुपोषण दिवस प्रत्यक्षात साजरा करण्यात आला तसेच साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धायगुडे मॅडम यांनी ऍनिमिया व हिमोग्लोबिन यावर महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी ICDC विभागाच्या CDPO मॅडम, सर्व पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका,खामगाव च्या माजी सरपंच सौ.माधुरी जाडकर,साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे खजिनदार गोरख भोसले, व इतर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भोसले सर यांनी केले तर दोन्ही अंगणवाडी बीट च्या वतीने सेविका सुरेखा वारे यांनी आभार मानले