Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन-माजी नगरसेवक अशोकराव जाधव

 


फलटण चौफेर दि ३काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ, मलठण दरवर्षी प्रमाणे दिनांक ३ रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना ने सुरूवात होणार आहे दररोज मनोरंजनाचे , संगीत खुर्ची, चित्र कला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हास्य नगरी, भारुड, तसेच दांडिया अशा भरगच्च कार्यक्रमाने व होम मिनिस्टर खेळ पैठणी चा खास महिला साठी कार्यक्रम आयोजित केले आहेत दररोज रात्री ८ वाजता आरती व त्यानंतर रोजचे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येतात दसऱ्याला काळूबाई देवीची पालखी निघते.फलटण मधील शिवरुद्र झांज पथक या पारंपारिक वाद्यात पालखी मिरवणूक मलटण मधून सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून आरती नंतर नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. या वेळी आकर्षक दारूगोळा उडविला जातो.हे सर्व कार्यक्रम काळुबाईनगर नवरात्र उत्सव महिला समिती काळूबाई नगर यांचे मार्फत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.