Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक भवनासाठी फलटण येथे जागेची उपलब्धता करुन देणार-श्रीमंत संजीवराजे

 




फलटण चौफेर दि २४  फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर भवनासाठी निवेदन दिले होते या निवेदनाची पूर्तता करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक विचार करुन या सामजिक उपक्रमासाठी आपण जागा उपलब्ध करून पूर्तता करु अशी ग्वाही दिली.  या संदर्भात बोलताना श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी या भवन साठी फलटण शहर हद्दीतील नगरपालिकेच्या मालकीची किँवा शहरानजीक जाधववाडी किंवा कोळकी येथे आपण जागा उपलब्ध करुन समाज बांधवांच्या सामजिक मागणीची पूर्तता करु. असे आश्र्वासन दिले.तसेच लोणंद येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अनावरण करुन फलटण येथे चौकाचे नामस्मरण  होळकर  घराणे हे आपल्या तालुक्यातील मुरूम या गावचे आहे.पण मल्हारराव होळकर यांनी त्यावेळी माळवा येथे जाऊन इंदूर ची गादी आपल्या कर्तुत्वाने स्थापन केली आणि हाच वारसा राजमाता यांनी अनेक शिवमंदिर यांचा जीर्णोध्दार, पिण्याच्या पाण्याच्या सोयी, तसेच घाटांची उत्तम बांधणी अश्या बऱ्याच सामजिक उपक्रमातून त्यांनीं समाजसेवा केली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर करुन आम्ही याबाबत कृतिशील राहू असे सांगितले या मागणी साठी फलटण तालुक्यातील प्रमुख समाज बांधव रामभाऊ ढेकळे वाखरी, जेष्ठ नेते शंकरराव माडकर, भिमदेव बुरूंगले, दादासाहेब चोरमले, व्यंकट दडस, महादेव सोनवलकर, योगेश माडकर, दादासाहेब महानवर यांनी धनगर समाज बांधवांच्या वतीने प्रतिनिधित्व केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.