फलटण चौफेर दि ४ फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिरीष दोशी, शिरीष भोसले, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे हे मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील मूल्यांचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण व्हावा त्यांनी गांधीजींच्या सत्याग्रह, अहिंसा आणि स्वावलंबन या तत्वांचा अवलंब करावा , तसेच शास्त्रीजींच्या साध्या जीवनशैली आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा नरेंद्र नार्वे यांनी दिली.कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.