Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचा भाजप मध्ये प्रवेश

 


फलटण चौफेर दि ३  शिवसेना उबाठा  गटाचे/फलटण तालुकाप्रमुख  प्रदीप झणझणे यांनी आज  माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला .फलटण तालुक्यामध्ये या वेळेला आमदार बदलायचा या संकल्पनेतून आज प्रदीप झणझणे यांनी प्रवेश केलेला आहे लढवय्ये व कायम शेतकरी शेतमजूर जनते साठी झटणारे ह कार्यकर्ता म्हणून प्रदीप झणझणे यांची ओळख आहे. यावेळी प्रदीप झणझणे यांनी सांगितले की माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायला सुरुवात झालेली आहे या तालुक्यातील शेतकरी शेतमजूर युवक हा दादांवर विश्वास ठेवून या तालुक्याचा खरं विकास होऊ शकतो म्हणूनच मी आज उबाठा  गटाला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, अभिजित नाईक निंबाळकर. राजेंद्र काकडे, विक्रांत झणझणे विशाल नलवडे व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.