विडणी (योगेश निकाळजे) - ब्रम्हचैतन्य दूध संकलन व शीतकरण केंद्र विडणी यांच्यावतीने दूधउत्पादकांना दिवाळी निमित्ताने बोनस वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. श्रायबर डायनामिक्स डेअरीज बारामती, दिपगंगा मिल्क अँण्ड ग्रो प्रोडक्ट्स व विडणी (राऊतवस्ती) येथील ब्रम्हचैतन्य दूध संकलन व शीतकरण केंद्र यांच्यासंयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त यावर्षीही संस्थेस दूध पुरवठा करणाऱ्या सर्व सभासदांना १ रुपये २० पैसे प्रति लिटरप्रमाणे बोनस वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला या कार्यक्रमास श्रायबर डायनामिक्स डेअरीजचे दूध संकलन विभागप्रमुख प्रवीण आवटे दिपगंगा मिल्क अँण्ड प्रॉडक्टसचे सर्वेसर्वा अजय फराटे सरपंच सागर अभंग पशुवैद्यकीय अधिकारी ड़ॉ.अनिल परघणे, तृप्ती शिंदे, शीतल ठोंबरे,सुनिता कोलवडकर ,निखिल पाटणकर, मुकुंद शिंदे, उद्योजक दिलिप रसाळ, मंगेश नाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित दूध उत्पादकांना जनावरांचे आरोग्य त्यांची निगा,खाद्य दूध वाढीसाठी उपाय तसेच जनावरांची काळजी जोपासना कशी घ्यावी दूधउत्पादकांना कर्जाविषयी ची सखोल माहिती यावेळी प्रमुख मान्यवरांनी दिली, ब्रम्हचैतन्य दूध संकलन केंद्राचा पारदर्शक कारभार व विश्वासामूळेच हे दूधकेंद्र अल्पावधीतच नावारूपास आल्याचे सरपंच सागर अभंग यांनी सांगितले.
ब्रम्हचैतन्य दूध संकलन केंद्राचे चेअरमन अमोल नाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की दूध संकलनाच्यावतीने दरवर्षी दूधउत्पादकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी पुणे येथे प्रशिक्षण सहलींचे आयोजन करण्यात येते तसेच दरवर्षी बेंदूर सणाला जनावरांसाठी मोफत साहित्यवाटपही करण्यात येते यावर्षीही १६लाख ३० हजार बोनसचे वाटप करण्यात आले असून यापुढेही आपण दूधउत्पादकांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जास्त दूधपुरवठा करणाऱ्या सभासदांचा सपत्नीक शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह ,पैठणी व बोनसची रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले उपस्थितांचे स्वागत चेअरमन अमोल नाळे यांनी केले तर आभार नवनाथ कोलवडकर यांनी मानले.