फलटण चौफेर दि २१ छत्तीसगड येथील नारायणपूर विभागातील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत भूसुरुंगाचा स्फोट होऊन खंडाळ्यातील वीर जवान अमर पवार हे शहीद झाले. आज सकाळी १० वाजता बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शहीद जवान अमर पवार यांचे पार्थिव सकाळी सातच्या सुमारास खंडाळा येथे पोहोचणार आहे. खंडाळ्यातून बावडा येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येणार आहे. तेथे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा प्राथमिक शाळेजवळील मैदानापर्यंत नेण्यात येणार असून येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.