फलटण चौफेर दि ९:- गोसावीवस्ती, खामगाव ता फलटण येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून फलटण ग्रामीण पोलिसांनी अनिल प्रभू चव्हाण (वय ३९), रोहित प्रल्हाद घाडगे (वय २४), संतोष बाबा जाधव (वय ३५), शहाजी शिवाजी जाधव (वय ३६, सर्व रा. गोसावीवस्ती, खामगाव) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून १ हजार ५२० रुपये रोख, जुगाराचे साहित्य व ९० हजार रुपये किंमतीची दचाकी जप्त करण्यात आली.