विडणी - भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्यावतीने वर्षावास प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली आहे. दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्यावतीने संपूर्ण फलटण तालुक्यातील गावांमध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून बिबी ता.फलटण येथे वर्षावास प्रवचन मालिका मोठ्या उत्साहात संपन्न झाली ,यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा(पूर्व) अध्यक्ष व प्रवचनकार आयु. नानासाहेब मोहिते सर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर यांचे बौद्ध धम्मासाठी कार्य व त्याग तसेच बौद्ध धम्माविषयी सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी फलटण तालुका महासचिव आयु.बाबासाहेब जगताप ,संस्कार सचिव बजरंग गायकवाड,संघटक आनंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळ (भिमनगर) येथील पदाधिकारी,उपासक उपासिका , युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.