फलटण चौफेर दि २४
कोळकी ता फलटण येथील न्यू आशिष प्लायअँड ग्लास सेंटर व शेजारी असणाऱ्या पखाले प्लंबिंग मटेरियल अँड सिरॅमिक सप्लायर या दुकानातील १३ लाख ७१ हजार ८१६ रुपये च्या किंमतीच्या हार्डवेअरच व प्लंबिंग चे साहित्य अज्ञात चोरट्याने दुकान फोडून लंपास केले असल्याची घटना घडली आहे याबाबत अक्षय राजेंद्र घनवट, रा. शारदानगर, कोळकी व शशिकांत पखाले रा पखालेमळा कोळकी यांनी फलटण शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि २२ रोजी रात्री ८ दि २३ रोजीच्या सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान कोळकी येथील संत सावतामाळी कमानीसमोर न्यू आशिष प्लाय अँड ग्लास सेंटर या व शेजारी असणाऱ्या शशिकांत जयसिंग पखाले रा. पखालेमळा, कोळकी, ता.फलटण, जि.सातारा यांच्या पखाले प्लंबिंग मटेरीअल अँड सिरँमिक सप्लायर्स या दुकानातील १३ लाख ७१ हजार ८१६ रू किंमतीचे हार्डवेअर, प्लंबिंगचे साहित्य व रोख रक्कम ही दोन्ही दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञाताने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.आर.शिंदे करीत आहेत