फलटण चौफेर दि ३० इंदोर मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या ५ व्या राज्य योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत बिबी ता फलटण गावची सुकन्या श्रेया विकास जगताप हिला रौप्यपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे १२ मराठा लाईट इन्फन्ट्री धाना सागर मध्य प्रदेश या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यामध्ये एकूण ८ मुलांनी सहभाग घेतला होता यामध्ये श्रेयाला रौप्य पदक मिळाले. ती PM श्री केंद्रीय विद्यालय धाना मध्य प्रदेश येथे सहावीच्या वर्गात शिकत आहे.श्रेयाचे वडील विकास वसंतराव जगताप हे मूळचे वडगाव (बीबी) फलटण येथील रहिवासी असून ते भारतीय सैन्य दलात मध्यप्रदेश येथे कर्तव्यावर आहेत श्रेयाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे व तिच्या प्रशिक्षिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे