फलटण चौफेर दि ३० बारामती येथील तुळजाराम चतुरचंद (टी सी)महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची त्याच्यात वर्गातील एका विद्यार्थ्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीत शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थी व त्याच्याच वर्गातील दुसरा विद्यार्थ्यां यांची भांडणे झाली होती मात्र या भांडणाचे नंतर तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले यामध्ये संशयित व त्याच्या दुसऱ्या साथीदाराने अथर्ववर कोयत्याने वार केले यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथे उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनास्थळी बारामती पोलीस स्थानकातील कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे टी सी महाविद्यालयीन परिसरात घबराटीचे वातावरण आहे