Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरवडीतील रस्त्याचे श्रीमंत संजीवराजे व आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

 


फलटण चौफेर दि. १६ 

सुरवडी ता फलटण गावातील बहुप्रतिक्षित पवारमळा ते पाच सर्कल या रस्त्याचे भूमिपूजन व सुरवडी-खराडेवाडी- तडवळे, सुरवडी ते साखरवाडी या रस्त्याचे लोकार्पण   फलटण कोरेगावचे आ दिपकराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किरण साळुंखे पाटील, मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश साळुंखे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, के के भोसले, अभयसिंह नाईक निंबाळकर ,खराडेवाडीचे माजी सरपंच रवींद्र टिळेकर, महादेव साळवे, माजी केंद्रप्रमुख राजाराम जगताप, सुरेश घारगे, संतोष जगताप, दत्तात्रय घारगे(सर),  अरविंद घारगे, बाळासाहेब घारगे,संतोष घारगे, दौलत पवार, दशरथ नलवडे, राहुल पवार,नितीन  पवार, विशाल पवार, विनोद नलवडे, प्रशांत पवार, विजय निंबाळकर, प्रमोद पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रविवार दिनांक १५ रोजी हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सुरवडी, बिबी, आदर्की बु., आळजापूर, कापशी, हिंगणगाव, टाकूबाईचीवाडी, सासवड आदी ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाट्न समारंभ व  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत  सुरवडी-खराडेवाडी-तडवळे ५ कोटी ६० लाख रुपये किंमतीच्या रस्त्याचे लोकार्पण,पवारमळा ५ सर्कल डांबरीकरण करणे ४१ लाख रुपये, हिंगणगाव एम.एस.ई.बी. सबस्टेशन ३ कोटी ७९ लक्ष, मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन / ३ बंधारे १ कोटी ४० लक्ष, सासवड ते बडेखान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे ४ कोटी ५० लक्ष, सासवड ते घाडगेवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी, सासवड ते रासकर वस्ती रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे.इ. कामांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.