Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजेंमुळे खंडकरी शेतकरी व कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी- लक्ष्मणराव नाईक निंबाळकर

 


साखरवाडी पुढारी वृत्तसेवा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे शेती महामंडळाच्या कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून एक एकराच्या आतील जमिनींचे वाटप व भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याची कार्यवाही निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्याची मागणी खंडकरी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना  निवेदना मार्फत करण्यात आली होती  याबाबत येत्या आठवड्याभरातच यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रांताधिकार्‍यांनी दिल्याची माहिती खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांनी दिली 

संपूर्ण राज्यातील हजारो खंडकरी शेतकरी व कामगारांच्या प्रलंबित मागण्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे न्याय मिळाला असून श्रीमंत रामराजे समितीने केलेल्या शिफारसीनुसार कामगारांना घरासाठी दोन गुंठे जमीन देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्वता मान्यता दिली असून चौथ्या व  पाचव्या वेतन आयोगानुसार मागील थकीत देणी मिळावीत यासासाठी सुद्धा  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळा  येथील शेत जमिनी परत मिळाव्यात यासाठी शासनाने सहकार्य करून औरंगाबाद हायकोर्टात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला व श्रीरामपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांना साडेसात हजार एकर जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाचे सर्व महाराष्ट्रातील कामगार व शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत असल्याचे लक्ष्मणराव निंबाळकर व शरदराव जाधव यांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.