वास्तविक प्राथमिक शिक्षण, हा शिक्षणाचा मुख्य पाया, सहा ते दहा या मेंदू घडणीच्या वयातच, लेखन, वाचन, गणन, ही कौशल्य मेंदूमध्ये तयार होऊन कायमची टिकण्याची व्यवस्था व्हावी लागते, विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षण करत असते, आजचे शिक्षण विद्यार्थ्याला आपले वाटत नाही, आपले वाटणारे शिक्षणच विद्यार्थ्यांना जीवनाच्या वाटेवर आणून सोडते, अन्यथा त्याचे जीवन भरकटल्याशिवाय राहत नाही, विद्यार्थी स्वावलंबी बनला पाहिजे, हा कर्मवीर भाऊरावंचा विचार त्यासाठी मार्गदर्शक ठरतो. नोकरी मिळवणे, हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नसून, चांगले जीवन जगणे हे होय !
परंतु आजच्या शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट आहे, चौथीपर्यंतच्या मुलांना निट वाचता येत नाही, आठवीपर्यंत नापास न करण्याने मुलांना शिक्षणाबद्दलची अनास्था वाढते, पालकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, पूर्वीचे पालक अडाणी होते, म्हणून लक्ष देत नव्हते, आजचे पालक सुशिक्षित असूनही वेळ नाही या कारणाने दुर्लक्ष करतात. घरी मुलांच्या अभ्यासाची उजळणी घेत नाहीत,
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक हा मोकळा पाहिजे, त्याच्यावर कसलेही घरगुती, ऑफिशियल तान असता कामा नयेत, याचही सर्वेक्षण होणं गरजेचं !
परंतु आजच्या शिक्षकाची अवस्था शिकवणे कमी, पण शासनाने अशैक्षणिक काम लादल्याने त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होते,
ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आम्ही अचानक एका कामानिमित्त, नजीकच्या शाळेवर भेट दिली असता, भली मोठी शाळा पण बरेचसे वर्ग मोकळे होते, आम्हाला ज्या मॅडमला भेटायचे होते, त्या एका वर्गात काहीतरी लिहीत होत्या, त्यांच्या परवानगीने आम्ही आत गेलो, समोरच्या टेबलवर बसलो, बराच वेळ त्या लिहिता लिहिता बोलत होत्या, वर्गात मुला- मुलींचा गोंधळ चालू होता, मधूनच त्या मुलांना शांत करत होत्या, पुन्हा तसाच प्रकार चालू, मुलांना अभ्यास सांगून त्या परत लिहीत होत्या, आम्ही वर्गात नजर टाकली असता असे लक्षात आले, वर्गात एकूण तीस पस्तीस लहान मोठी मुले मुली होत्या, आम्ही मॅडम ना विचारले वर्गात लहान मोठी मुले दिसत आहेत, यावर त्या म्हणाले आहो ! ही पहिली ते चौथी चार वर्गाची मुले मुली आहेत, यांना शिकवणाऱ्या दोन मॅडम रजेवर आहेत, म्हणून ती सर्व मुले माझ्या वर्गात आहेत, म्हणजे सरासरी एका वर्गात दहा अकरा मुले मुली,
तुम्ही काय करताय ? यावर त्यांनी उत्तर दिले, अहो मला आजच्या आज शासनाला माझ्या विभागाचा तांदळाचा हिशोब अर्जंट द्यावयाचा आहे. त्यामुळे त्या मुलांना न शिकवता तांदळाचा हिशोब करत होत्या. मूळ उद्देशापासून शाळा लांब जात आहेत.
शासनाने अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांनी मुलांना शिकवूच नये अशी परिस्थिती निर्माण केली आहे,
आज शासनाने कमी पटसंख्या, व कमी गुणवत्ता ही कारणे दाखवून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, चांगले काम करणारा शिक्षक आणि काम न करणारा शिक्षक यांचे योग्य मूल्यमापन होत नाही, यातून नुकसान होते ते विद्यार्थ्यांचेच शिक्षण क्षेत्राबद्दलची ही कमालीची उदासीनता आहे, राष्ट्रावर येणारे संकटच होय, याचा सर्वाधिक विचार आता केला नाही तर भविष्यातील चित्र स्पष्टच आहे.
पालकांमध्ये प्राथमिक शाळांबद्दल असलेली अनास्था, इंग्रजी माध्यमातील शाळांकडे असणारा वाढता कल, व पूर्वीप्रमाणे शिक्षकांचा पालकांशी असणारा कमी संपर्क, यामुळे प्राथमिक शाळेची दुरावस्था झाली आहे, कमी विद्यार्थी आणि जास्त शैक्षणिक खर्च अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सर्व खर्च सर्वसामान्य जनतेच्या उत्पन्नाच्या करातूनच होत असतो, विद्यार्थी वाढीकडे शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचं, पण तसं होताना दिसत नाही. आजही अपवादात्मक शाळांमध्ये शिक्षक बढतीकडे लक्ष न देता उत्तम प्रकारे विविध प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिक्षण देत आहेत, अशाप्रकारे ग्रामीण भागातील शाळांचा सर्वे करून अशा शिक्षक शिक्षिकांचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक अशा प्रकारे काम केले तर डोक्यावरील टांगत्या तलवारीची भीती वाटणार नाही.
रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जि. सातारा.फो.९९७०७४९१७७*