फलटण चौफेर दि २५
निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून आज सकाळी ६ वाजेपर्यंत भाटघर, निरा देवघर वीर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३७ मि.मी. एकूण२३५४मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९५.८०% पाणी साठा व ७३३ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६१ मि.मी. एकूण १०४७मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून ९३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५७ मि.मी. एकूण १९६२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९९.७९ % पाणी साठा झाला असून ५१०५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३१ मि.मी. एकूण ४१५ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे २४५३५ क्यसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे चारही धरणात मागील २४ तासात ४.५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे