फलटण चौफेर दि ३०
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णया अंतर्गत कापशी ता फलटण येथील शरयू ॲग्रो साखर कारखान्यात कारखान्यात ६ महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण पदासाठी शैक्षणिक पात्रता पात्र युवकांना खालील जागांसाठी अर्ज सादर करता येणार आहेत
इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांसाठी अटी खालील प्रमाणे आहेत.
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३५ वर्षे असावे,उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक घेतलेला असावा.
इच्छुक उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.