फलटण चौफेर दि ४
गुणवरे ता फलटण गावच्या हद्दीत फलटण पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयित विलास आनंदराव जाधव वय ४५ वर्ष रा गुणवरे ता फलटण जिल्हा सातारा. हा त्याच्या घराच्या आडोशाला बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करीत असताना आढळून आल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या ताब्यातून ९४० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या १३ बाटल्या हस्तगत केल्या असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली