फलटण चौफेर दि ४
९ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागपंचमी सण साजरा होणार असून या सणाचे पार्श्वभूमीवर फलटण शहरात पतंग उडविण्यात येतात. अशावेळी नायलॉन मांजा दोरा वापरला जावू नये, यासाठी फलटण शहर पोलीस ठाणे कडून फलटण शहरातील पतंग - पतंगाचा दोरा विकणाऱ्या १५ व्यावसायिकांना नोटीस दिली असून, नायलॉन दोरा विकू नये असे सांगण्यात आले आहे. त्यांचेकडे नायलॉन दोरा मिळून आला नाही. ही मोहीम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून पतंग उडविणारे व्यक्तीकडे सुद्धा ते नायलॉन मांजा दोरा वापरतात का, याची तपासणी करण्यात येणार आहे. नायलॉन दोरा वापरल्यास त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांचे तर्फे वरील विषयाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात फलटण शहर पोलीसांनी सहभाग घेतला असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमारशहा यांनी दिली