फलटण चौफेर दि २४
फलटण शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून गोविंद दूध डेअरी, पंढरपूर रोड, येथून १९ मे रोजी चोरीस गेलेली
सीबी शाईन मोटर सायकल नं.एमएच ११ सीएल ०२६९, २० मे रोजी चोरीस गेलेली सीबी युनिकॉर्न मोटर सायकल नं.एम एच ११ बी यु ५९९१ व १३ मार्च रोजी चोरीस गेलेली HF डिलक्स मोटर सायकल नं. एम एच ११ बी जे ८०६७ या सर्व मोटर सायकल माळशिरस पोलीसांनी ४ एप्रिल मधे तपासात जप्त केल्या होत्या. त्या तिन्ही मोटर सायकल फलटण शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून संशयित गणेश बाळासो जाधव, वय १९ वर्षे, रा. जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर व अनिल उर्फ संदीप दिलीप लोंढे, वय २५ वर्षे, रा. मेडद, तालुका माळशिरस यांना अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार हेमा पवार करीत आहेत.