फलटण चौफेर दि १६ श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड(झणझणे) येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नाळे सर यांनी केले व उपस्थित यांचे स्वागत प्रशालेच्या प्राचार्या सौ काकडे एस जी मॅडम यांनी केले. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ नलवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत संविधान स्काऊट गाईड एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी सासवड व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी सासवड गावचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य श्री धैर्यशील अनपट (बापू) सासवड गावचे प्रथम नागरिक श्री राजेंद्र काकडे सर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विनायकदादा अनपट माजी सरपंच श्री राजाभाऊ काकडे तसेच इतर अनेक मान्यवर ग्रामस्थ शिक्षण प्रेमी व पालक तसेच माता भगिनी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंद सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य ,आरोग्य अधिकारी ,बँक व्यवस्थापक, अंगणवाडी ताई व मदतनीस सर्व आशा सेविका प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक गण शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक व एन. एम. एम. एस. आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत सासवड तसेच सौ. संगीता पांडुरंग जाधव ( माजी सरपंच ग्रामपंचायत सासवड ) यांच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन तसेच प्रशालेच्या वतीने करण्यात आला हर घर तिरंगा अंतर्गत चित्रकला स्पर्धा प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते . ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री खताळ सर कलाशिक्षिका सौ पंडित मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ काकडे एस जी मॅडम यांनी केले तसेच आभार प्राध्यापक नाळे सर यांनी मानले.