Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड (झणझणे) येथे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान तपासणी संपन्न

 


फलटण चौफेर दि ९। श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे महात्मा फुले हायस्कूल व जुनिअर कॉलेज सासवड( झणझणे)येथे आज गुरुवारदिनांक ८ऑगस्ट  रोजी विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियान अंतर्गत विद्यालयाची शालेय तपासणी झाली.

                 विद्यालयाच्या तपासणीसाठी फलटण पंचायत समिती गिरवी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. निकाळजे साहेब, बीआरसीच्या समन्वयक कुंभार मॅडम, बीआरसी चे समन्वयक श्री शिंदे साहेब यांनी विद्यालयाची तपासणी केली यामध्ये शालेय पोषण आहार, स्वच्छतागृह, PAT चाचणी, स्काऊट गाईड, अध्ययन निष्पत्ती यासंबंधी तपासणी केली. या तपासणीतून काही मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या व शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुकही केले. प्रशालेच्या प्राचार्या सौ. काकडे मॅडम व शिक्षक शिक्षिका  यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ ,फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आलायाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.