फलटण चौफेर दि ११
मुधोजी कॉलेजच्या ग्राउंड वरती एन.सी.सी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण १०० कॅडेटची निवड करण्यात आली.
मंगळवार दिनांक ६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ ची एनसीसी प्रथम वर्ष ( रेगुलर /FSFS ) प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती पार पडली. या प्रक्रियेसाठी अत्यंत काटेकोरपणे परीक्षा घेऊन प्रथम वर्षासाठी १०० कॅडेट ची निवड करण्यात आली . या निवड प्रक्रियेसाठी बावीस महाराष्ट्र बटालियन, एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमन्नार सेना मेडल , ॲडम ऑफिसर कर्नल नागेंद्र पिल्लेई, सुभेदार मेजर तानाजी भिसे, ट्रेनिंग जेसीओ संभाजी शिंदे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडली.
मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. पंढरीनाथ कदम , मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.ज्ञानदेव देशमुख , वरीष्ठ व कनिष्ठ विभागाचा सर्व स्टाफ यांनी एन.सी.सी प्रथम वर्षासाठी निवड झालेल्या सर्व कॅडेटचे तसेच प्रवेश प्रक्रीया यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल कॅप्टन संतोष धुमाळ व त्यांच्या टीमचे आभार मानले.