फलटण चौफेर दि २३ फलटण येथील पतीपासून विभक्त राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिला लग्न करण्याचे व नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डिसेंबर २०२२ ते १८ मे २०२४ दरम्यान वारंवार शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याची घटना घडली असून संशयित हैदर शब्बीर मेटकरी रा. मेटकरी गल्ली याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,, पीडित महिला पतीपासून २०२१ पासून विभक्त राहते त्यांचा कोर्टामध्ये घटस्फोटाचा खटला चालू आहे याचाच फायदा घेत संशयिताने पीडित महिलेला 'मी तुझ्याशी लग्न करतो तसेच तुला नोकरी लावतो' म्हणून डिसेंबर २०२२ ते १८ मे २०२४ दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले तसेच लग्न कधी करणार? अशी विचारणा केले असता 'तुला बुरखा घालावा लागेल,टिकली लावायची नाही,नमाज पडायचे' असे म्हणून मारहाण केल्याचे व दिनांक १५ मार्च २०२४ रोजी पीडित महिलेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे धमकी देऊन मारहाण व बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा करीत आहेत