फलटण चौफेर दि २१
सुरवडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत दिनांक २१ रोजी सकाळी सहा वाजण्या पूर्वी कमिन्स कंपनीच्या समोरील पार्किंग मध्ये ट्रक ट्रेलर हयगयीने चालवून पादचारी कमलजीत विकरा सिंग वय ४४ रा हसाबाद पोस्ट बरवाडा रेवरी हरियाणा याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित संजय श्रीराम मुरत यादव राहणार तेजपूर तालुका फुलकर जिल्हा ईलाबाद उत्तर प्रदेश याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची फिर्याद सुरवडीचे पोलीस पाटील संतोष पवार यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बदने करीत आहेत