फलटण चौफेर दि १६ खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज आज मंगळवार, दि. १६ रोजी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,अजित पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीच्या अन्य मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांसमवेत सोलापूर येथे दाखल करणार असल्याची माहिती भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली
मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठे शक्तिप्रदर्शन करीत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
