फलटण चौफेर दि २८
लोणंद पोलीस स्थानकातील कर्मचारी दि २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याचे सुमारास वाठार बु. याठिकाणी शासकिय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बी. भोसले यांना बातमीदारामार्फत माहीती मिळाली की संशयित विशाल चंद्रकांत गाढवे वय ४१ रा. वाठार बु. ता. खंडाळा याने त्याचे घराचे शेजारी असलेल्या शेडमध्ये अवैद्यरित्या गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे त्या बातमीचे आधारे विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यांचे घराचे पश्चिम बाजुस असले पत्राचे शेडमध्ये अचानक ९.१५वाजण्याचा सुमारास छापा टाकला असता शेडमध्ये कुरकुरेच्या पुढयांचे खालील बाजुस लपवुन ठेवलेल्या सात लहान मोठ्या गोणीमध्ये ४९ हजार ९०० रुपये किंमतीचे गुटखा मिळुन आला पोलिसांनी संशयिताला अटक केली असुन त्यास खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार नितीन भोसले, धनाजी भिसे, महिला पोलीस प्रिया नरुटे यांनी केली