फलटण चौफेर दि १४
विंग ता कराड येथे ड्रायडे दिवशी अवैध दारूची विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चौघा जणांवर कारवाई करून तब्बल १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी
दिनांक १४ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विंग ता. कराड जि. सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी चोरटी दारुची विक्री चालू आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सपोनि पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखालील पथकास सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने शिंदेवाडी विंग ता. कराड जि. सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी दुपारी छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क पथक कराड यांचेसह कारवाई केली असून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे संशयित
आनंदा सोपान माने वय ४३ रा पापर्डे ता पाटण जि सातारा,अक्षय आप्पासो वाघमारे वय २५ रा विंग ता कराड जि सातारा,रणजित दिनकर काटे वय २८ रा तडवळे ता बत्तीस शिराळा जि सांगली व अजित नागेश खबाले वय ५० रा विंग ता कराड जि सातारा(मालक हॅाटेल रॅायल लॅन्डस्केप) हे जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे दारु विक्री बंदी आदेशाचा भंग करुन विदेशी दारुची विक्री करीत असताना मिळून आले असून त्यांच्या कब्जात विदेशी दारु रॉयल स्टॅग, रॉमॅनो वोडका, व्हाईट मिसचिफ, डी.एस.पी.ब्लॅक, डॉ. ब्रँडी, ब्लेंडर प्राईड, मॅकडॉवेल नं.१ अशा वेगवेगळया कंपनीचा १३ लाख ११ हजार २०४रुपयाच्या विदेशी दारुचा माल व रोख रक्कम १२ हजार ६६०रुपये असा एकुण १३ लाख २३ हजार ८३५४ रुपयाचा माल मिळून आला असून सदर इसमांवर कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, सपोनि सुधीर पाटील, पोउनि सचिन भिलारी, श्रेणी पोउनि तानाजी माने, सफौ. सुधीर बनकर, पोहवा साबीर मुल्ला, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मंगेश महाडीक, सनी आवटे, शिवाजी भिसे, प्रविण कांबळे, मोहन नाचण, सचिन साळुंखे, राजु कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, प्रविण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन जगताप, नितीन येळवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रीमती डॉ. उमा पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यानी सहभाग घेतला.
