फलटण चौफेर दि १२
साखरवाडी ता फलटण येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्यावर वैद्यमापनशास्त्र व शेतकरी संघटनेच्या भरारी पथकाने दिनांक १२ फेब्रुवारी रोजी अचानक भेट देऊन ५ ते ७ उसाने भरलेल्या ट्रक व ट्रॅक्रची इलेक्ट्रॉनिक्स स्केलवर प्रमाणित वजनाची नियमाप्रमाणे तपासणी केली असता श्री दत्त इंडिया कारखान्याचे सर्व वजन काटे बरोबर व अचूक असल्याचे स्पष्ट केले या भरारी पथकामध्ये फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव, लेखापरीक्षक एस सी शिरतोडे, रा पा आखरे, पुरवठा निरीक्षक मनोज काकडे , शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर,नितीन यादव, किरण भोसले,पो कॉ एस बी खरात यांचा सहभाग होता
श्री दत्त इंडिया कारखान्याने मागील ५ गळीत हंगामामध्ये गाळपाला आलेल्या ऊसाची बिले व वजन काट्यातील अचूकतेच्या जोरावर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून यावर्षी कारखाना १५ मार्च अखेर चालवून ९ लाख टन गाळप पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी व्यक्त केला यावेळी कारखान्याचे केन मॅनेजर सदानंद पाटील,एस के भोसले,बाबासाहेब जाधव उपस्थित होते.