Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाखरी ता फलटण येथे पाण्याची टंचाई



फलटण चौफेर दि २२ : वाखरी ता फलटण येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने वेळीच या पाणी टंचाईबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाखरी ग्रामस्थांतून होत आहे. यंदा वाखरी व परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामापासूनच पिकांना पाणी कमी मिळाले आहे. ऊस व नकदी पिके धोक्यात आली आहेत. कमी पावसामुळे पाणी पातळी घटली असून ओढे, नाले, धरणे व विहिरी आटल्या आहेत. वाखरी तलावातील ९५ टक्के पाणी कमी झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या योजना विहिरीला पाणी मिळेनासे झाले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.