Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी मध्ये इलेव्हन स्टार आयोजीत फुटबॉल स्पर्धांचा दिमागदार शुभारंभ.

 


फलटण चौफेर दि ९

साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या मैदानावर इलेव्हन स्टार फुटबॉल चषक अंतर्गत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांचे भव्य आयोजन दिनांक ९, १०, ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये  करण्यात आले आहे. इलेव्हन स्टार चषक ही महाराष्ट्रामधील ग्रामीण भागामध्ये आयोजित केलेली सर्वात मोठी जुनी आणि ऐतिहासिक अशी मानाची फुटबॉल ट्रॉफी आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून नामांकित २४ फुटबॉल क्लब ने आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये साखरवाडी,फलटण ,निरा ,बारामती, पाचगणी, कराड, सातारा ,सांगली, मिरज कोल्हापूर,गडहिंग्लज, पुणे मुंबई ,ठाणे दौंड अहमदनगर धुळे, या विभागांमधून संघ सहभागी झाले आहेत. या दिमागदार स्पर्धांचा आज ९ फेब्रुवारी२०२४  रोजी  उद्घाटन सोहळा झाला. याकरिता प्रमुख अतिथी म्हणून. आमदार दीपकराव चव्हाण,श्री दत्त इंडियाचे प्रशासकीय अधिकारी जनरल अजितराव जगताप , श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, डी के पवार संचालक महानंदा दूध मुंबई , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती, शंकरराव माडकर, मातोश्री कंट्रक्शन चे संजय भोसले,साखरवाडी  गावचे माजी सरपंच विक्रम सिंह भोसले.  श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले,राजेंद्र भोसले, होळ सोसायटी चेअरमन चंद्रकांत भोसले ,के के भोसले, एस के भोसले,नितीन,काका भोसले, भोसले,अभंयसिंह नाईक निंबाळकर, बागडे सर,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मनोगतात शंकरराव माडकर यांनी क्रीडा संकुलाची मागणी आमदार साहेब तसेच श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे केली. श्रीमंत सत्यजित राजे यांनी मैदानी खेळांना प्रोत्साहन देऊन युवा पिढीला मैदानी खेळाचे महत्व सांगितले. आमदार दीपकराव चव्हाण यांनी. श्री दत्त इंडिया  तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये योग्य समन्वय साधत यावरती सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केएफसी सह्याद्री विरुद्ध फलटण जिमखाना फलटण हा उद्घाटन सामना खेळला गेला. यावेळी इलेव्हन स्टार फुटबॉल क्लबचे सदस्य. विक्रम खानविलकर, शरद भोसले, अप्पा गायकवाड, बॉबी गलियाल, नितीन कुचेकर, विनोद कुचेकर, संजय बनकर, संजय जाडकर, सुभाष बोंद्रे, नितीन बोंद्रे, जॉन गायकवाड उपस्थित होते. या सर्व उद्घाटन सोहळ्याचे तसेच इलेव्हन स्टार चषक २०२४ याचे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक शिवव्याख्याते अमोल खेसे यांनी केले


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.