माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे लहान मोठे प्रसंग येतात, त्यावेळेस हर्ष व खेद होतो, वैयक्तिक जीवनात ते प्रसंग माणसाला अनुभव देतात लग्न, मृत्यू, एकदा सत्काराचा प्रसंग, असे एक ना अनेक प्रसंग येतात, आनंदाचे व सुखाचे प्रसंग आपल्याला अगोदर माहीत असतात, त्यामुळे तो प्रसंग येत असताना, माणसाच्या मनाची तयारी झालेली असते, किंवा काही प्रसंगात अनेक दिवसांपासून उपचार घेऊनही डॉक्टरी उपचाराला शरीर साथ देत नसले तर, एक ना एक दिवस हा जाणार, याविषयी कुटुंबाची रोज थोडी थोडी तयारी झालेली असते.
अशा दुःखद प्रसंगात दुःख झेलण्याची ताकद माणसांमध्ये तयार झालेली असते, परंतु अचानक येणाऱ्या दुःखद प्रसंगाने मनुष्य हतबल होतो, *घरातील कर्त्या पुरुषाचे जाण्याने, संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो, काही कुटुंबात वृद्ध आई- वडील, पत्नी लहान लहान मुले असतात, कित्येक दिवस या दुःखातून कुटुंब सावरत नाही, अशा कुटुंबाला नातेवाईक,समाजाचा मानसिक आधार हवा असतो, मी ही अशा दुःखातूनच गेलो आहे,
परंतु कोणाचे कोणा वाचून काही राहत नाही, याप्रमाणे *उन्हाळ्यातील उष्णतेच्या दाहकतेचा, हिवाळ्यात विसर पडतो, कालांतराने गेलेल्या माणसाची आठवण, ही हळूहळू हवेत विरून जाते, एक उणीव मात्र जाणवते, जखम बरी होते, पण व्रण मात्र तसाच राहतो, परंतु आठवणींचे मोल त्यांनाच विचारा जे आठवणी, सोबत घेऊन जगत असतात,.... ती म्हणजे धर्मपत्नी, तिलाआयुष्यभर पती विरहाचे दुःख घेवून फिरावे लागते
दुःख फक्त स्त्रियांनाच असते, असे नाही तर एखाद्याची धर्म पत्नीचे निधनाचे दुःख पतीला, व त्यांच्या मुलांना, तरुण मुला- मुलीचे जाण्याचे दुःख आई-वडिलांनाही सारखेच असते.
सुख किंवा दुःख स्वीकारण्यासाठी माणसाने आपली ओंजळ पुढे केलेली असते, तो प्रसंग अनुभवताना माणूस जरी सुखावला, किंवा दुःखी झाला, तरीही असेच सुख किंवा दुःख दुसऱ्यानेही भोगले आहे, परंतु आपल्याला आलेले दुःख हे नव्याने असते, पण या जगाला नसते, या जाणिवेने आपली सुखदुःख थोडी बाजूला काढून टाकतो, आणि जगाला जाणवणार नाही, आनंदात जगत असतो, हेच तर जीवन!
अचानकपणे जवळचा मित्र नातेवाईक यांच्या जाण्याने मनाला हुरहूर लागते,
आजकाल माणसाचे जीवनमान अनेक सुख सुविधांनी उंचावले असले तरी, त्याचे आरोग्य मात्र आहार आणि विहारातून धोक्यात आले आहे, अनेक आजारांना सामोरे जात असताना, लवकर बरे होण्यासाठी ऍलोपॅथिक, रासायनिक औषधे घ्यावी लागतात व त्याचा नकळत साईड इफेक्ट शरीरावर होत असतो, भविष्यात घडणाऱ्या अशा अघटीत घटनांवर मात केली पाहिजे,कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपणावरच असते ना ?
शेवटी सत्य अधोरेखित करावयाचे वाटते की,जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी, लावलेला वेळ म्हणजे आयुष्य होय
शब्द संकलन
श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन.९९७०७४९१७७