Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुका होलार समाजाची कार्यकारीणी जाहीर.. गणेश गोरे यांची तालुकाअध्यक्ष ओमकार अहिवळे यांचीतालुका उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड...

 


फलटण चौफेर दि २७

  शासकीय विश्रामगृह कोळकी येथे होलार समाजाने फलटण तालुका कार्यकारिणी राहुल करे (बाबा) यांच्या मार्गदर्शनाने युवक नेतृत्व संदीपभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली ढवळ गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पै. गणेश गोरे यांची तालुका अध्यक्षपदी आणि ओमकार अहिवळे मंगळवार पेठ,फलटण यांची तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.


          प्रास्ताविक अमोल गोरे यांनी केले. यावेळी त्यांनी समाजाने तळमळीने व निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.


         महेंद्र गोरे यांनी लोकसभेपाठोपाठ येणारी विधानसभा निवडणुक फलटण तालुक्यातील  होलार समाज पूर्ण ताकतीने कोणत्याही परिस्थितीत लढवणार आणि होलार समाजातील पहिला आमदार फलटण तालुक्यातून विधानसभेत पाठवणार असे जाहीर केले.


     नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गणेश गोरे व उपाध्यक्ष ओमकार अहिवळे यांनी  समाजापुढे अनंत अडचणी आहेत.त्या सोडवण्याचा, तसेच शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू. असे  मत व्यक्त केले.

        यावेळी फलटण तालुक्यातील होलार समाजातील तरुण वर्ग व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.